लागवडी पासून ते काढणी पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आम्ही देतो या मध्ये फळपिकात डाळिंब पेरू सीताफळ या पिकात आमचे दीर्घ अनुभवी लोक काम करतात.
अशा पिकामध्ये छाटणी या गोष्टीला अतिशय महत्व आहे त्या मुळे सुरवातीला आम्ही संपूर्ण छाटणी व्याव्स्थापन या कडे अतिशय लक्ष देतो. या नंतर पाण्याचा ताण कधी कसा किती द्यावा याचे संपूर्ण मार्गदर्शन केले जाते.
बहार धरण्यासाठी आधी काय करावे लागते याचे ही संपूर्ण माहिती दिली जाते यान नंतर खताचे व फवारणी व्यवस्थापन हे बागेत येऊन पाहणी करून केले जाते यात साधारण पणे १५ ते २० दिवसांनी बागेत पाहणी करून मार्गदर्शन दिले जाते.
विशेष सूचना : प्रत्येक शेतकऱ्याचे पाणी,जमीन,हवामान,रोपांतील अंतर,अंतरपिक, हाताळण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे आमचे मार्गदर्शन घेत असताना प्रत्येक शेतकऱ्याला एकाच नियोजन मिळणार नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रिंटेड शेडूल आम्ही देत नाही (प्रत्यक्ष बागेत पाहून) त्या केळीची वाढ,वय,जमीन,अंतर व भौतिक गुणधर्म इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन आम्ही खताचे फवारणीचे पाण्याचे व्यवस्थापन करतो. सर्वशेतकऱ्यांनासाठी एकच शेडूल देणे हे १००% चूक आहे त्यामुळे प्रत्येक वेळी आमच्या प्रतिनिधीशी संपर्क करून नियोजन करावे जमिनीतून संतुलित खत पाणी दिल्यास अधिक फवारणी करण्याची गरज नाही खर्च पण कमी होईल !