केळी Banana
घड फवारणी वेळापत्रक
केळफुल कापणे
केळीची निसवण होवून सर्व फण्या केळकमळातून बाहेर पडतात. शेवटची फणी बाहेर आल्यानंतर 2 ते 3 दिवसांत खालील उमलणारे केळफुल धारदार विळयाच्या सहाय्याने कापून घ्यावे. केळफुल वेळीच कापल्याने त्यास अनावष्यक होणारा अन्नपुरवठा हा वाढणा-या घडास मिळतो व घडाच्या उत्तम वाढीस मदत होते. त्याचप्रमाणे केळफुलात लपणा-या रेड रस्ट थ्रिप्स या किडीचा प्रादुर्भाव कमी करता येतो. ही कापलेली केळफुले बागेमध्ये इतस्ततः न टाकता गुरांना खाद्य म्हणून किंवा कंपोस्ट खड्डयात टाकावीत.
पाने कापणे
घड वाढीच्या अवस्थेत घडांना घासून फळांना विकृत करणारी तसेच रोगट पाने वेळीच कापून बागेबाहेर नेवून नष्ट करावीत.
फण्यांची विरळणी करणे
फळांच्या आकारमानात सकारात्मक बदल होवून घड लवकर परिपक्व व्हावा, यासाठी फण्यांची वेळीच विरळणी करणे आवश्यक आहे. केळीच्या प्रमुख व्यापारी वाणांमध्ये 9 पेक्षा जास्त फण्या येतात व सर्व फळांना योग्य पोशण न मिळाल्याने त्यातील फळांचे आकारमान एकसारखे राहत नाही. परिणामी मालाचा दर्जा ढासळतो. निर्यात योग्य चांगल्या दर्जाची केळी मिळण्यासाठी घडावर 6 ते 8 फण्या ठेवून खालील बाजूच्या अतिरीक्त फण्या धारदार विळयाच्या सहाय्याने व्यवस्थीतपणे कापून टाकाव्यात. यामुळे झाडावरील घडाला व्यवस्थित अन्नरसाचा पुरवठा होवून फळांचे आकारमानात सकारात्मक बदल घडून येतो.
झाडांना आधार देणे
वरील सर्व सोपस्कार झाल्यानंतर घडाची झपाटयाने वाढ होवून आकारमानात व वजनात सुधारणा होते. झाडाच्या कक्षाबाहेर लोंबणा-या या वजनदार घडामुळे अनेकवेळा झाड वाकते व वारा आल्यास काहीवेळा मोडते किंवा उन्मळुन पडते. घडाच्या वाढीच्या अवस्थेत झाड मोडू किंवा पडू नये म्हणून झाडांना आधार देणे आवश्यक आहे. यासाठी केळीची खोल लागवड करावी, खोडाला वेळोवेळी मातीची भर लावावी तसेच काठया किंवा पाॅलीप्राॅपीलीन पट्टया वा नायलाॅन दो-यांच्या सहायाने निसवलेल्या झाडांना आधार द्यावा. 9- केळी घडाची योग्य जोपासना व्हावी, यासाठी केळी लागवडीपासूनच काळजी घेणे आवश्यक असून पिकाची व्यवस्थित आंतरमषागतय् अन्नद्रव्ये व पाणी व्यवस्थापन, रोग व कीड व्यवस्थापन याची योग्य अंमलबजावणी करणे महत्वाचे ठरते.
पहिली फवारणी
पाणी १०० लिटर + G9 जीब्रालीन २० मिली + अरेना ४२ ग्राम + अमृत ५२ ५०० मिली
दुसरी फवारणी
पाणी १०० लिटर + अमृत ५० ५०० मिली + झक्कास ७५ मिली + अरेना ४२ ग्राम
तिसरी फवारणी
पाणी १०० लिटर + G9 जीब्रालीन २० मिली + अरेना ४२ ग्राम + झक्कास ७५ मिली
चौथी फवारणी
पाणी १०० लिटर + अमृत ४५ ५०० मिली + फोलिबीयोन १०० मिली + G9 जीब्रालीन २० मिली
पाचवी फवारणी
पाणी १०० लिटर + G9 जीब्रालीन २० मिली + अमृत ५२ ५०० मिली + अरेना ४२ ग्राम
सहावी फवारणी
पाणी १०० लिटर + अरेना ४२ ग्राम + अमृत ५० २५० मिली + अमृत ४५ २५० मिली
सातवी फवारणी
पाणी १०० लिटर + G9 जीब्रालीन २० मिली + अमृत ५० ५००मिलि
मार्गदशन मिळवण्यासाठी या लिंक वर क्लिक करा Click Here
Videos
Photos



