About Us

Patil Farming Technology & Solution

 

शेतकरी बंधुनो नमस्कार आम्ही गेल्या १० वर्षापासून संपुर्ण महाराष्ट्रात कृषीक्षेत्रात कार्य करत आहोत.

पाटील फार्मिंग टेक्नोलॉजी अन्ड सोल्युशन च्या माध्यमातून जे तंत्रज्ञान आम्ही देतो ते काय आहे?

ज्ञान + अनुभव = तंत्रज्ञान, (ज्ञानाला अनुभवाची जोड म्हणजे तंत्रज्ञान).

ज्या मध्ये आम्ही प्रत्येक पिकाच संपूर्ण मार्गदर्शन करतो ते पण लागवडी पासून काढणी पर्यंत यामध्ये.

फळपिकात : केळी डाळिंब पेरू आंबा सीताफळ द्राक्ष चिकू पपई.

वेलवर्गीय पिकात : कलिंगड खरबूज काकडी कारले दोडका भोपळा.

भाजीपाला पिकात : बटाटा टोमाटो अद्रक कांदा वांगी मिरची शिमला मिरची.

फुलशेतीमध्ये : झेंडू गुलाब कार्नेशन ( पोलिहाउस मधील सर्व पिके ).

अशा अनेक पिकात आम्ही लागवड अंतर वाणाची निवड लागवडची वेळ पाणी व्यवस्थापन रोग कीड इत्यादी मार्गदर्शन करतो प्रत्यक्ष शेतात येऊन पिक पाहणी करून मार्गदर्शन करतो.

आमचा उद्देश केवळ टिशूकल्चर केळी रोपे पुरवणे इतकाच नसून त्यासोबत खात्रीशीर हमखास उत्पादन वाढवण्यासाठी संपूर्ण तंत्रज्ञान देतो.

आज पर्यंत महाराष्ट्रातील ४० हजार शेतकरी आमच्याशी जोडले जाऊन त्यांनी उत्पादन हमखास वाढवले आहे आणि ते आज ही आमच्या सोबत आहेत. बर फक्त तुमच्या उत्पादनात वाढ झाली इथ शेतकऱ्याचा प्रश्न सुटत नाही त्या नंतर उत्पादन केलेला शेतमाल विकायचा कुठ किंवा योग्य बाजार भाव मिळण पण आवश्क असत. तरच शेतकऱ्याचा फायदा होईल त्यासाठी पण आम्ही सुविधा देतो ज्या मध्ये एक्स्पोर्ट असेल किंवा लोकल व्यापारी असतील यांची सांगड घालून देतो.