Tissue Cultural Plant
केळी लागवड? केळी रोप? मागगदर्गन?
केळी लागवडीसाठी पोषक हवामान असे पाहिजे :
- २४ ते २८°c तापमान केळीसाठी अतिशय योग्य आहे.
- २७°c तापमानाला केळीची आदर्श वाढ होते .
- आद्रता ७५ ते ८०% इतकी असावी .
- वाऱ्याचा वेग २० किमी इतका असावा
केळी लागवडीसाठी मातीची स्थिती अशी पाहिजे :
- मातीचा सामू ६.५० ते ७.५० च्या दरम्यान असावा.
- अतिजास्त आम्ल आणि अल्कली जमीन नको.
- शेतात पाणी साठून राहिले तर केळीचे नुकसान होते.
- पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन पाहिजे.
- अति क्षारयुक्त आणि चुनखडी जमीन नको
आमच्याकडील G9 टिशू कल्चर रोपांची वैशिष्ट्ये
- कीड आणि रोगांपासून मुक्त रोपे.
- व्हायरस विरहित उच्च उत्पादन देणारी जात .
- एकसारख्या वाढीमुळे उत्पादन वाढते.
- संपूर्ण बागेत एक समान घड पाहण्यास मिळतील .
- संपूर्ण बागेत एक समान बुंदा किंवा खोड पाहण्यास मिळेल .
- पिक लवकर येते
- वर्षभरात कधीही पिक घेता येते कारण रोपे वर्षभर मिळत राहतात.
- कमी वेळात दोनदा पिके घेता येतात त्यामुळे लागवडीची किंमत स्वस्त होते.
- केळी घडाचा ९५% – ९८% झाड भार सोसते.
- मूळ रोपे उच्च उत्पादन देणाऱ्या झाडा पासून तयार केली जातात
- लागणी पेक्षा खोडवा पिकाचे उत्पादन हमखास जास्त येते
- केळीच्या रोपांची एकसमान वाढ होते
- केळीची निसवण (वेन) योग्य वेळी होते
- केळीच्या झाडाचे एक समान घड पाहण्यास मिळतील
- निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी जे काही गुणधर्म लागतात ते पूर्ण होतात
- केळीच्या फाण्यामाधी अंतर हा अतिशय योग्य आहे
- प्रत्येक फनी मध्ये केळीची योग्य संख्या असते
- घडाच्या मधील दांडा हा अधिक सक्षम आहे
- कमी जमीन असणा-याशेतकऱ्याना लहान जमीनीचा जास्तीतजास्त वापर करता येऊ शकतो.
विशेष सूचना : प्रत्येक शेतकऱ्याचे पाणी,जमीन,हवामान,रोपांतील अंतर,अंतरपिक, हाताळण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे आमचे मार्गदर्शन घेत असताना प्रत्येक शेतकऱ्याला एकाच नियोजन मिळणार नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रिंटेड शेडूल आम्ही देत नाही (प्रत्यक्ष बागेत पाहून) त्या केळीची वाढ,वय,जमीन,अंतर व भौतिक गुणधर्म इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन आम्ही खताचे फवारणीचे पाण्याचे व्यवस्थापन करतो. सर्वशेतकऱ्यांनासाठी एकच शेडूल देणे हे १००% चूक आहे त्यामुळे प्रत्येक वेळी आमच्या प्रतिनिधीशी संपर्क करून नियोजन करावे जमिनीतून संतुलित खत पाणी दिल्यास अधिक फवारणी करण्याची गरज नाही खर्च पण कमी होईल !
केळी रोपे बुकिंग Click Here
Videos
Photos



